Sunday, June 5, 2011

(३५) जेव्हा तुझ्या बटांना............................गबाळग्रंथी कारभार



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



जेव्हा तुझ्या बटांना गबाळग्रंथी कारभार




जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

कवी : मंगेश पाडगांवकर


गबाळा तुझा सदाचा कारभार न्यारा
पाहून रीत तूझी उपजतो उदरी गुबारा

आभाळ घायाळ होते दृश्यां होऊन साक्षी
संन्यस्त वृत्ती येते, मला कालीमाता रक्षी!
उबगेस अंतरीच्या नाही मुळी निवारा
गबाळा तुझा सदाचा कारभार न्यारा

डोळे मिटून घेतो, दृश्ये विविध चुकतना
ही वेळ “झोकण्याची”, मानस मनी चुकतना
देशील का तू जागा थोड्या तरी विचारां
गबाळा तुझा सदाचा कारभार न्यारा

नशिबास आगळा हा का सांग वास येतो
विचारी तुज पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा विचारमतीचा उगवेल सांग तारा
गबाळा तुझा सदाचा कारभार न्यारा

No comments:

Post a Comment