खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
कुठे शोधिसी रामेश्वर | एक रामबाण सल्ला |
---|---|
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहीले डोळे उघडून वर्षाकाठी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा काय तुला उपयोग आंधळ्या, दीप असून उशासी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेस मातीतून मोती हाय अभाग्या, भगवे नेसून घर सन्यासून जाशी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी अवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी कवी : मंगेश पाडगांवकर | कुठे शोधिसी मुंबापुरी अन कुठे शोधिसी दिल्ली उघडाया गुंफा अलिबाबाची कशा शोधिसी किल्ली झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहीले डोळे उघडून वर्षाकाठी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा काय तुला उपयोग आंधळ्या, दिवे असून मोहल्ली कुठे शोधिसी मुंबापुरी अन कुठे शोधिसी दिल्ली उघडाया गुंफा अलिबाबाची कशा शोधिसी किल्ली आकड्यांच्या घेऊन माळा लावलेस तू व्यर्थ आकडे आणि घेऊन फासे हाती फेकलेस त्यांते व्यर्थ जुगारी अरे पुरुषा, भगवे नेसुन का न "गुरू" तू होशी कुठे शोधिसी मुंबापुरी अन कुठे शोधिसी दिल्ली उघडाया गुंफा अलिबाबाची कशा शोधिसी किल्ली देव बोलेल तव मुखातून, देव डुलेल तव नेत्रातून झणी होऊनी देव जादुगर पैकाद्री तुजसाठी उभारिल अवती भवती भगत जमुन करतील उदो तव गल्लोगल्ली कुठे शोधिसी मुंबापुरी अन कुठे शोधिसी दिल्ली उघडाया गुंफा अलिबाबाची कशा शोधिसी किल्ली |
No comments:
Post a Comment