खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
शिंग फुंकिले रणी | फलाण्या मंत्र्यांची फलाण्या गावाला भेट |
---|---|
शिंग फुंकिले रणी, वाजतात चौघडे सज्ज व्हा, उठा उठा, सैन्य चालले पुढे दास्यकाल संपला, शांत काय झोपला? अग्नि येथ कोपला, पेटुनी नभा भिडे लोकमान्य केसरी, गर्जतात वैखरी माजला असे अरी, चारु त्याजला खडे विस सालचा लढा, जाहला किती बडा इंग्रजास बेरडा, आणिले कसे रडे तीस सालची प्रभा, उज्ज्वला भरी नभा गांधि अग्रणी उभा, ठाकला रणी पुढे शीर घेउनी करी, दंग होउ संगरी घालवू चला अरी, सागरापलीकडे कवी : वसंत बापट | शिंग फुंकले कुणी, वाजवले चौघडे सज्ज व्हा, उठा उठा, मंत्री आले हो बडे कलियुग संपले, शांत काय झोपला? पेटुनि उपटले मंत्री, शीर त्यांचे नभा भिडे लोकमान्य मंतरी, बहुरत जंतरमंतरी माजले भारी जरी, मारू नका त्यांसी खडे निवडणुकीतला लढा जाहला होता बडा विरोधकास बेरडा चारले त्यांनी खडे दिव्य दिव्य मंत्रीप्रभा, उज्ज्वला भरी नभा वंद्य अग्रणी उभा, ठाकला सभेपुढे कागुद घेउनी करी, भाषण ठोकेल मंतरी घालवू नका ही संधी, ऐकाया भाषण बसा पुढे |
No comments:
Post a Comment