खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
अंतरीच्या गूढगर्भी | ते प्रेम आता वाढले |
---|---|
अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले ते प्रेम आता आटले दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मी तू रंगले आभाळ पूर्वी, तेच आता फाटले एकदा ज्यातून मागे सूर संवादी निघाले वंचनेने तोडले, ते स्नेह तंतू आटले शेवटी मंदावलेल्या वादळी वार्याप्रमाणे राहणे झाले दिवाणे, ते गीत गाणे कोठले कवी : ना.घ.देशपांडे |
अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले ते प्रेम आता वाढले दूर सोनेरी सुखाचे पाहिले रम्य स्वप्न मी तू रंगले आभाळ पूर्वी, तेच रंग आभाळी उधळले एकदा ज्यातून मागे सूर संवादी निघाले, होऊन दृढ स्नेहतंतू सूर सप्तस्वर्गी पोचले शेवटी मंद मंद शीतल वार्याप्रमाणे राहणे झाले स्वर्भूमीतले, हे गीत गाणे बहरले! |
No comments:
Post a Comment