Tuesday, June 14, 2011

(७०) माझिया मना..............................सांजवेळ ही भटकभ्रमंतीची



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



माझिया मना सांजवेळ ही भटकभ्रमंतीची



माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना

माझिया मना, जरा बोल ना
ओळखू कसे मी, हे तुझे ऋतू
एकटी न मी सोबतीस तू
ओळखू कशा मी तुझ्या भावना

माझिया मना, जरा ऐक ना
सांजवेळ ही, तुझे चालणे
रात्र ही सुनी, तुझे बोलणे
उषःकाल आहे नवी कल्पना

कवी : सौमित्र


बा नवरोबा, जरा थांब ना
थांबवी तुझे इशारे, थांबवी खुणा
आणते घाई तुझी मानेत वेदना

करण्या नट्टापट्टा, नाही तुज कल्पना,
लागे तास एक, विचार ह्या दर्पणा
न एकटीच मी, तमाम अंगना -
घेती एक तास, किमान, जाण ना

सांगते मी जे, ते जरा ऐक ना
सांजवेळ ही भटकभ्रमंतीची
अन्‌ जाऊन बागेत भेळपुरी खाण्याची
ऐशी तुझी-माझी चाले दिनक्रमणा...रमणा!


No comments:

Post a Comment