खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
तुला पाहिले मी | तिला पाहिले मी |
---|---|
तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुझे केस पाठिवरी मोकळे इथे दाट छायातुनी रंग गळतात या वृक्ष-माळेतले सावळे तुझी पावले गे धुक्याच्या महालात ना वाजली ना कधी नादली निळा गर्द भासे नभाचा किनारा न माझी मला अन् तुला सावली मना वेगळी लाट व्यापे मनाला जसा डोंगरी चंद्र हा मावळे पुढे का उभी तू तुझे दुःख झरते जसे संचिताचे ऋतु कोवळे अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या उरी केवढा तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा कवी : ग्रेस |
तिला पाहिले मी बस्मधे शुक्रवारी तिचे केस होते बुचड्यात बांधलेले जिथे रंग एका बाजूचे पांढरेभुरे, दुसर्या बाजूचे रंग होते काळे तिची नजर भासली जणू धुक्यात निश्चल, तिळभर न तिची नजर फिरली; उघडपणे होती ती विचारात चूर लावून पहाता टक लाज मला वाटली काय विचार असावा व्यापला तिच्या मनाला जसे व्यापे धुके कधी गगन सगळे होते का काही दुःख अटळ तेथे; असती संचिताचे ऋतू वेगवेगळे असे येता विचार माझ्या मनात गलबलला जीव एक क्षणभर खिडकीतून बाहेर वळवली मी नजर हेतू उघड - पडावा विसर |
No comments:
Post a Comment