Saturday, June 4, 2011

(३०) विसरु नको.....................................छत्री



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



विसरु नको छत्री



विसरु नको श्रीरामा मला
मी तुझ्या पाऊली जीव वाहिला, प्रिया

किती जन्म झाले, तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी
तुझी सावली झाले,
घेऊनी हिंडले सतीचा वसा, प्रिया

तू सांब भोळा, उमा पार्वती मी
तू कृष्ण काळा, तुझी राधिका मी
युगायुगांचे नाते आपुले वेगळे,
जुळे श्यामला, प्रिया

कवी : सुधीर मोघे


विसरु नको कधी, कुठे मला
संरक्षिणी मी तुझ्या भल्याची, प्रिया

ऊन असो, पाऊस असो, तुझी रक्षिका मी
दाम देता तू दुकानदारा, तुला भेटले मी
तुला सावली झाले,
तू घेऊनि हिंडता मला, प्रिया

तू विसरभोळा, तुझी छत्री रे मी
तू वेंधळा, तुझी वारित्रा, तुझी जलत्रा मी
युगायुगांचे नाते आपुले
तू छादित अन्‌ छ्त्री तुझी मी, प्रिया


No comments:

Post a Comment