Saturday, June 4, 2011

(२९) बगळ्यांची माळ..................असशी तू अवलिया



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



बगळ्यांची माळ असशी तू अवलिया




बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात

छेडिति पानात बीन थेंब पावसाचे
ओल्या रानात खुले उन अभ्रकाचे
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

त्या गाठी, त्या गोष्टी नारळिच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली
रिमझिमते अमृत ते कुठुनि अंतरात
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

हातांसह सोन्याची सांज गुंफताना,
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजताना,
कमळापरि मिटति दिवस उमलुनी तळ्यात
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

कवी : वा. रा. कांत




असशी तू अवलिया एक शंभरात
कोण जाणे काय असे तुझिया मनात

भर पावसात गाशी गीत मंदिरांचे
खुल्या रानी खुले गीत तुझे उंदिरांचे
नि मृदंग तुझा घुमतो दूर डोंगरांत
असशी तू अवलिया एक शंभरात

त्या गाठ्या, ते शेव नारळिच्या खाली;
पौर्णिमेला दिवसाढवळ्या तुझी चैन झाली -
रिचवता त्याउप्पर “अमृत” पोटात
असशी तू अवलिया एक शंभरात

लंब्याचौड्या कथा तू अरबी गुंफतांना,
वाटीमध्ये गाठ्या किती ते तू मोजताना
आवरू न शके झोप माझ्या डोळ्यात
असशी तू अवलिया एक शंभरात

सोडवत बसता सगळे मी उखाणे
चालूच राही तुझे भरणे बकाणे
सलतो विचार एक माझिया उरात -
असशी तू अवलिया एक शंभरात



No comments:

Post a Comment