खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
दिवस तुझे हे फुलायचे | शेखमहंमदी स्वप्न |
---|---|
दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे! स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे, गाण्यात हृदय झुरायचे! मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली, श्वासात चांदणे भरायचे! थरारे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार, फुलांनी जखमी करायचे! माझ्या या घराच्या पाशी, थांब तू गडे जराशी, पापण्या मिटून भुलायचे!!! कवि : मंगेश पाडगांवकर | नशीब माझे उगवायचे, अचानक जमून जायचे! स्वप्नात गुंगुन जाणे, पडुन गादीवर उताणे, दिवास्वप्नी मन रमायचे! माझी ही छोटी खोली प्रासादासम प्रचंड झाली, स्वनात चांदणे फुलायचे! घेई कुणी कोकिळा तान विसरून सुरांचे भान, त्या तानेत रंगायचे! माझ्या पायांपाशी पडती सुवर्णराशी, डोळे मिटुन पहायचे! |
दिवस तुझे हे फुलायचे | एका पेन्शनरचे गीत |
---|---|
दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे! स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे, गाण्यात हृदय झुरायचे! मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली, श्वासात चांदणे भरायचे! थरारे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार, फुलांनी जखमी करायचे! माझ्या या घराच्या पाशी, थांब तू गडे जराशी, पापण्या मिटून भुलायचे!!! कवी : मंगेश पाडगांवकर | दिवस कसे तरी तरायचे, झोपाळ्यावर झुलायचे! स्वप्नात गुंगत जाणे, मधुनच डुलक्या घेणे, नेत्र मधुन उघडायचे! कधी गाठावी शयन खोली, घालावी शपथ ओली, हातरीवर एका पहुडायचे! थरारे कोळियाचे घर छती, माशीचा घातवार; विधिक्रम : कोळ्याने तिला भक्षायचे! माझ्या या घराच्या पाशी, थांबता एक कुत्री जराशी, उगाच तिने भुंकायचे!!! |
No comments:
Post a Comment