खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
गंजल्या ओठास माझ्या | गुंतल्या दाढीस माझ्या |
---|---|
गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे! आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे! पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो; वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे! सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो; सारखे अस्तित्व माझे पेटताना दर्वळू दे! लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे! आणु दे गा वंचकांना क्रूस छद्माचा दयाळा; रक्त येशूचे परी डोळ्यांत माझ्या साकळू दे! कवी : सुरेश भट | गुंतल्या दाढीस माझ्या मला कुरवाळू दे कुरवाळता कुरवाळता गीत हे रचू दे पांगळी बंदिस्त माझी मती आकाशून जावो वादळी आवेग माझा चार लोकांना कळू दे सारखे कवन माझ्या ध्यानीमनी खळाळो सारखे अस्तित्व माझे पेटताना जळू दे लाभु दे आशीर्वचन मोठमोठ्यांचे परंतू तापल्या मस्तका माझ्या मानसन्मान मिळू दे देई रे मम दूषकांना क्रूस तीक्ष्ण दयाळा नि रक्त तयांचे धरणीवर भळभळा वाहू दे! |
No comments:
Post a Comment