खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
भय इथले संपत नाही | ना कधिच संपणार माझ्या गूढ गूढ कविता |
---|---|
भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते... मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते... हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया त्या वेळी नाजुक भोळ्या, वार्याला हसवून पळती क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ, फुटला खांब थरथरत्या बुबुळापाशी , मी उरला सुरला थेंब संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे ते धुके अवेळी होते, की परतायची घाई मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई ㅤㅤㅤकवी : ग्रेस | ना कधिच संपणार माझ्या गूढ गूढ कविता मी संध्याकाळी गातो, होत्या ज्या केल्या उठताबसता हे वेध चंद्रग्रहणाचे, ही युवती पसरुन काया निजली झाडाखाली काळ कंठित ग्रहण सराया त्या वेळी तिच्या मिटल्या डोळ्यां चुंबून काजवे पळती अन राखून धोरण पुढचे लुकलुकणे ते थांबवती तो स्पर्श मंद हळवासा युवतीस जागवुनी गेला सीतेच्या उपवनातिल जणू राघू नभी उडाला देऊळ पलिकडे असे जे, आवारात जयाच्या खांब त्यावर जाऊन बसला राघू, झेप घेउनी लांब संध्येतील कमल फुलासम आनंदे फुलली युवती मोहक हलवुन अंग हलकेच उठली मग ती स्तोत्रात इंद्रिये शशीच्या गुणगुणता , तिची, रमली ते संपता संपत नाही, न एक ओळ ती विस्मरली हाय, धुके अवेळी पडले, झाली तिस परतायची घाई मेंदूतुन ढळली माझ्या ह्या गूढ गीताची नवलाई! |
No comments:
Post a Comment