Sunday, June 19, 2011

(१०८) (१) पाऊस कधीचा पडतो...............जहांबाज बायकोशी जन्माची गाठ
******(२) पाऊस कधीचा पडतो...............पाऊस जरासा पडला



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



पाऊस कधीचा पडतो जहांबाज बायकोशी जन्माची गाठ



पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा

कवी : ग्रेस



पाऊस शिव्यांचा पडतो
तड तड तड आरवाने,
झटक्यात जाग मज आली
भार्येच्या उच्च स्वराने!

डोळ्यात झापड होती
कष्टाने नेत्र उघडती
रागाने चढला पारा --तिचा!
शंभर अंश वरती!

पेटून दिसे उज्ज्वलिता
ती महामाया कोमला!
शब्दांच्या प्रहारांपायी
पोपडा छताचा कोसळला!

संदिग्ध बोलीच्या ओळी
तिच्या, ढवळतो वारा
माझिया मानगुटीवरती
समंध घेई आसरा!






पाऊस कधीचा पडतो पाऊस जरासा पडला



पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा

कवी : ग्रेस


पाऊस जरासा पडला
झाडांची हलली पाने
मज भासले उपजली स्फूर्ती
जरी मंद कूर्मगतीने

डोळ्यांना लावले पाणी
गरगर तरी डोळे फिरती
घेतला कागद अन्‌ झरणी
आणि बसलो खुर्चीवरती

पण "ट"ला "ट" जुळेना
होती प्रतिभेची विझली ज्वाला
जरी झटपटलो एक पूर्ण प्रहर;
कवितेचा बेत कोसळला !

संदिग्ध कवितांच्या ओळी
आकाशी ढवळे वारा
पण माझ्या मात्र पदरी
फक्त धुरळ्याला निवारा !


No comments:

Post a Comment