Sunday, June 19, 2011

(१०७) लपविलास तू हिरवा चाफा.................बा मंत्रीपदधार्‍या,...



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



लपविलास तू हिरवा चाफा बा मंत्रीपदधार्‍या,...


लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छ्पेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?

जवळ मने पण दूर शरीरे
नयन लाजरे, चेहरे हसरे
लपविलेस तू जाणून सारे
रंग गालिचा छ्पेल का?

क्षणात हसणे, क्षणात रुसणे
उन्हात पाउस, पुढे चांदणे
हे प्रणयाचे देणे घेणे
घडल्यावाचुन चुकेल का?

पुरे बहाणे गंभिर होणे
चोरा, तुझिया मनी चांदणे
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे
केली चोरी छ्पेल का?


कवी : ग. दि. माडगूळकर


लपविलास तू तव काळा पैसा
उघडाकीस कधि ना येइल का?
लूट लपवुनी लपेल का?

चपळ मने, तुंदील शरीरे
नयन चोरटे, चेहरे हसरे;
लपविलेस तू कसून सारे
ढोंग तुझे परि छ्पेल का?

क्षणात हसणे, क्षणात रोषणे
डोळा मारुन ड्रॉवर उघडणे
हे लाचांचे देणे घेणे
अनंतकाळ रे, लपेल का?

पुरे बहाणे तव साधुत्वाचे
चोरा, तुझिया मनी चांदणे
तूहि जाणे, सूर्यहि जाणे
डाकूगिरी तुझी छ्पेल का?
तव शत्रु न तुजवर टपेल का??



No comments:

Post a Comment