Sunday, June 19, 2011

(१०६) जे वेड मजला लागले..............रुग्णाइत आणि मनोविकारतज्ञ डॉक्टर



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



जे वेड मजला लागले रुग्णाइत आणि
मनोविकारतज्ञ डॉक्टर



जे वेड मजला लागले,
तुजलाहि ते लागेल का?
माझ्या मनीची ही व्यथा
कोणी तुला सांगेल का?

मी पाहतो स्वप्नी तुला,
मी पाहतो जागेपणी
जे मी मुकेपणि बोलतो
शब्दात ते रंगेल का?

हा खेळ घटकेचा तुझा,
घायाळ मी पण जाहलो
जे जागले माझ्या मनी,
चित्ती तुझ्या जागेल का?

माझे मनोगत मी तुला
केले निवेदन आज, गे
सर्वस्व मी तुज वाहिले,
तुजला कधी उमगेल का?

कवयित्री : शांता शेळके
चित्रपट : अवघाची संसार (१९६०)

वेड मजला लागले,
लोक असे म्हणतात का?
आहेत वेडे लोकच ऐशी
हमी मला देशील का?

मी पाहतो स्वप्नी मला,
पाहता स्वप्न जागेपणी
जागेपणी अन मी पहातो
निद्रितावस्थेत मी.

लपंडाव ना खेळ हा,
ना हुतूतू ना लंगडी;
मायेचाही न खेळ हा;
मी जागेपणी झोपतो.

वस्तुस्थिती असे जी तुला
केली निवेदित, डॉक्टरा;
आहेत वेडे लोकची, तू
हमी आता देणार ना?


No comments:

Post a Comment