Sunday, June 19, 2011

(१०२) गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



गोमू संगतीनं माझ्या तू
येशील काय?
दुकानातल्या फिरकीच्या तांब्याला
खुशामतमिश्र तंबी




गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
माझ्या पिरतीची रानी तू होशील काय?

आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय!
तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय!

गं तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं
माझं कालिज भोलं, त्याचं मासोली झालं

माझ्या पिरतीचा, सुटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा

तुझ्या नजरंच्या जादूला, अशी मी भुलणार नाय
रं माझ्या रूपाचा ऐना, तुझ्या जीवाची दैना

मी रे रानाची मैना, तुझा शिकारी बाणा
खुळा पारधी गं, जाळ्यामंदी आला आला आला

गं तुला रुप्याची नथ मी घालीन
गं तुला मिरवत मिरवत नेईन

तुज्या फसव्या या जाल्याला, अशी मी गावनार नाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?



आरं संगतीनं तुझ्या मी येणार ...हाय!
तुझ्या पिरतिचि रानी मी होनार हाय!



कवी : सुधीर मोघे
चित्रपट : हा खेळ सावल्यांचा (१९७६)

गोमू संगतीनं माझ्या तू येनार का नाय?
माजा पिरकीचा तांब्या तू होनार का नाय?

माज्या संगतीनं परवासाला तू येनारच हाय
माजा पिरकीचा तांब्या तू होनारच हाय

रं तुजं डौलदार झाकन, जसं सोन्याचं कंकन
माजं कालिज खुललं, त्याचं भंबोरी जालं

माज्या फिरतीचं सुटलंय फर्मान , राव
रं नग खेलूस डाव, नग खाऊस भाव

तुज्या चकाकीच्या जादूला मी भुलनार नाय
रं माज्या रुपयांची ऐट, तुज्या जीवावर जैत

रं मी गावाचा तलाटी, माज्या हातात चिट्टी
माज्या फिरतीचं सुटलंय फर्मान, राव

रं तुला रुप्याची झिलई मी दीन
रं तुला मिरवत मिरवत नीन

तुज्या फसव्या फुगव्याला मुळी मी भुलनार नाय
बर्‍या बोलं संगतीनं माज्या तू येनार का नाय?



आरं संगतीनं तुज्या मी येनारच हाय!
व्हय व्हय व्हय, तुजा पिरकीचा तांब्या मी
होनारच हाय!


No comments:

Post a Comment