Sunday, June 19, 2011

(१०१) उंट.........................................उमरखय्यामची कैफियत



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



उंट उमरखय्यामची कैफियत


क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, ’नाही, नाही.’
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला, ’करीन काही.’

अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळू जाहली हळूच जागी.

रूप असे पाहुनी अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.

उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली, ’आहे, आहे.’
...खय्यामाने भरले पेले;
महंमदाने रचले दोहे.

हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधित जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.

निळा पिरॅमिड दिसला का पण?
...खूण तयाची एकच साधी...
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.

कवी : विंदा करंदीकर


फिरु लागे त्याच्या टाळूभवती
एक मच्छर दिशाही दाही.
अशाच वेळी दुसरा उगवला;
सुरू केली त्याने शहनाई.

अन मानेच्या बुरुजावरुनी
चढू लागला हा दुसरा मच्छर.
झोप उडाली दूर झणि अन
खय्याम जाहला जागा सत्वर.

रूप पाहुनी ते जमदग्नीचे
ह्सले मच्छर दोघेही जण;
आणि त्याच्या मस्तकामधे
घडले रुबायतीचे सृजन.

"घुमू लागते मम टाळूभवती
इब्लिस डांबिस मच्छरयुगल;
’उच्छेद करावा कसा तयांचा’
शोधतो आता उघडुनि ’गुगल’.

“हा खय्याम इथे न खळला,
अहतबल, गुगल शोधित राही;
गुगल-शोध न केवळ मृगजळ,
भूकतहान मी विसरुन जाई.

“ऑं, पळाले कुठे दोघे जण?
म्हणे गुगल, ’पकडुनी मच्छर
मारा नि बांधा पिरॅमिड त्यांवर.’
निदान पिरॅमिड बांधतो आधी!”



No comments:

Post a Comment