खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
हृदयी जागा | राहुन जागा |
---|---|
हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिल का? देशिल का? बांधिन तेथे घरकुल चिमणे, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशिल का? दोन मनांची उघडी दारे, आत खेळती वसंतवारे दीप लोचनी सदैव तू रे, संध्यातारक होशिल का? घराभोवती निर्झर नाचे, जाणुन आपल्या गूढ मनाचे; झाकुन डोळे एकांताचे, जवळी मजला घेशिल का? कवी : पी.सावळाराम | राहुन जागा, तू महाराजा, भवानीला या घेशिल का? घेशिल का? बांधिन नावे तव देऊळ मोठ्ठे, स्वर्गाचेच रूप धाकटे भोकांड पसरत्या पण, जरा मुलीला उचलशिल का? बंद करते उघडी दारे, झोपमोड नको शेजारघरे झोप लोचनी सदैव तुझ्या रे, आज "हिरो" तू होशिल का? घरभर तांडव कन्या नाचे, जाणुन अपुले तंत्र सदाचे; झाकुन डोळे स्थिरप्रज्ञेने घेत झोप रहाशिल का? |
हृदयी जागा | माफक भाड्याच्या रहायच्या जागेची टंचाई |
---|---|
हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिल का? देशिल का? बांधिन तेथे घरकुल चिमणे, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशिल का? दोन मनांची उघडी दारे, आत खेळती वसंतवारे दीप लोचनी सदैव तू रे, संध्यातारक होशिल का? घराभोवती निर्झर नाचे, जाणुन आपल्या गूढ मनाचे; झाकुन डोळे एकांताचे, जवळी मजला घेशिल का? कवी : पी.सावळाराम | चाळीत जागा तुझिया बाबा, भाड्याने मज देशिल का? देशिल का? बांधिन तेथे घरकुल चिमणे, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे कार्ल्याचे जणु कोरीव लेणे, रहावयाला देशिल का? दोन खणांची ठेवुन दारे बंद, खेळतील माझी पोरे वीज चालू सदैव तू रे, सांजसकाळी देशिल ना? घराभोवती कचरा साचे, डागडुगीची गरजही भासे; झाकुन डोळे तिथे ठेवता भाडेकरू मज करशिल का? |
No comments:
Post a Comment