खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
दिव्यत्वाची जेथ प्रचिती | मंत्रीपदधार्याचे स्तवन |
---|---|
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती गाळुनिया भाळीचे मोती हरिकृपेचे मळे उगवती जलदांपरी येऊनिया जाती जग ज्यांची न करी गणती यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर घडिले मानवतेचे मंदिर परि जयांच्या दहनभूमिवर नाहि चिरा नाहि पणती जिथे विपत्ती जाळी उजळी निसर्ग-लीला निळी काजळी कथुनि कायसे काळिज निखळी एकाची सगळी वसती मध्यरात्रि नभघुमटाखाली शांतिशिरी तम चवर्या ढाळी त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी एकांगी डोळे भरती कवी : बा. भ. बोरकर | कर्तृत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती जमवत हिरे अन माणिकमोती सुवर्णरुप्यांचे मळे उगवती सर्व धन स्विसबॅंकी ठेवती जग ज्यांची करी फार स्तुती लाचा ज्यांनी घेऊनि भरपूर उभारले स्वसुवर्णमंदिर आणि ज्यांच्या जमीनजुमल्यावर किती इमारती नाहि गणती ज्यांची संपदा नभपट उजळी, लांब लांब लीलांची साखळी कथुनि ज्यांची भाटमंडळी श्रोतृगणांना थक्क करती मध्यरात्रि कुणी रंभारखेली ज्यां शिरी कौतुके चवर्या ढाळी कलियुग हे हो असे बकाली पाहुन माझे डोळे मिटती! |
No comments:
Post a Comment