खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
सैनिकाप्रत | सैनिकांना घरबसल्या प्रोत्साहन |
---|---|
सदैव सैनिका, पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे सदा तुझ्यापुढे उभी असे निशा सदैव काजळी दिसायच्या दिशा मधून मेघ हे नभास ग्रासती मधेच या विजा भयाण हासती दहा दिशांतुनी तुफान व्हायचे प्रलोभने तुला न लोभ दाविती न मोहबंधने पदांस बांधिती विरोध क्रोध वा तुला न थांबवी न मोह भासतो गजांत वैभवी न दैन्यही तुझे कधी सरायचे नभात सैनिका, प्रभात येउ दे खगांसवे जगा सुखात गाउ दे फुलाफुलांवरी सुवर्ण शोभु दे जगास शांतता, सुहास्य लाभु दे न पाय तोवरी तुझे ठरायचे कवी : वसंत बापट |
सदैव सैनिका, पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे सदा अम्हापुढे लाडूचकल्यांच्या बशा सदा मारतो अम्ही गप्पा अन माशा मधून शेंगदाणे अम्ही ग्रासतो कुणी विनोद करता हासतो दशदिशांतुनी घरी “दूरदर्शन” यायचे प्रलोभने तुला न लोभ दाविती न मोहबंधने पदांस बांधिती विरोध क्रोध वा तुला न थांबवी न मोह भासतो गजांत वैभवी न दैन्यही तुझे कधी सरायचे नभात सैनिका, प्रभात येउ दे खगांसवे जगा सुखात गाउ दे फुलाफुलांवरी सुवर्ण शोभु दे जगास शांतता, सुहास्य लाभु दे न पाय तोवरी तुझे ठरायचे सदा अम्हापुढे लाडूचकल्यांच्या बशा सदा मारतो अम्ही गप्पा अन माशा |
No comments:
Post a Comment