Sunday, June 19, 2011

(११८) झोपली ग खुळी बाळे..................माझ्या आयुष्याची (सुबोध) कहाणी



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



झोपली ग खुळी बाळे माझ्या आयुष्याची (सुबोध) कहाणी



झोपली ग खुळी बाळे,
झोप अंगाईला आली;
जड झाली शांततेची
पापणी ह्या रीत्या वेळी.

चैत्र बघतो वाकून
निळ्या नभातून खाली;
आणि वाऱ्याच्या धमन्या
धुकल्या ग अंतराळी,

शब्द अर्थाआधी यावा
हे तो ईश्वराचे देणे;
पेंगणाऱ्या प्रयासाला
उभ्या संसाराचे लेणे.

चैत्र चालला चाटून
वेड्या सपाट पृथ्वीला,
आणि कोठे तरी दूर
खुजा तारा काळा झाला,

आता भ्यावे कोणीं कोणा!
भले होवो होणाऱ्याचे;
तीरीमिरीत चिंचोळ्या
काय हाकारावे वेचे.

चैत्र चढे आकाशात
नीट नक्षत्र पावली;
आणि निळ्या वायूतून
वाट कापी विश्ववाली.

वेड्याविद्र्या नि वाकड्या
मनाआड मने किती;
चाळणीत चाळणी अन्
विचारात तरी माती.

चैत्रबापा, उद्या या हो
घेउनीया वैशाखाला;
आंबोणीच्या मागे कां ग
तुझा माझा चंद्र गेला?

आंबोणीच्या मागे पण
अवेळी का चंद्र गेला?

कवी : बा. सी. मर्ढेकर


उठली ग कार्टी माझी
जरि झोप माझी नव्हती सरली
पुरी झाली शांततेची
विल्हेवाट अवचित वेळी

सुपुत्र एक बघतो वाकून
कठड्यावरून गॅलरीच्या खाली
आणि माझ्या धमन्या
फुलल्या ग भल्या सकाळी

शब्द अर्थाआधी यावा
हे तो समंधाचे देणे;
पेंगणाऱ्या माझ्या मनात
शिव्यांचे झणि उद्भवणे

विचार गेला एक चाटून
वेड्या माझ्या मनाला,
धपाटा द्यावा सुपुत्रा जेणे
पृष्ठ त्याचा उष्ण व्हावा

आता भ्यावे की नाही त्याने
जाणून आता पुढे काय होणे
गॅलरीतून खाली पडणे
वा पृष्ठ त्याचा उष्ण होणे

म्हणे मी माझ्या मनात
"देवी भवानी पावली";
सुपुत्र उतरला कठड्यावरून
नि आला आत परतपावली

वेड्याविद्र्या नि वाकड्या
मनाआड मने किती;
चाळणीत चाळणी अन्
विचारात अती माती.

चैत्रमास आहे आज
घेउनीया वैशाखाला
येईल उद्या तो, मग
ज्येष्ठ घेउनी आषाढाला

आयुष्याची माझ्या ऐशी कहाणी,
नाही इतरांहून दिवाणी!


No comments:

Post a Comment