खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
रुणुझुणु रुणुझुणु | टुणुटुणु टुणुटुणु |
---|---|
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा चरणकमळदळू रे भ्रमरा भोगी तू निश्चळु रे भ्रमरा सुमनसुगंधु रे भ्रमरा परिमळु विद्गदु रे भ्रमरा सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा संत ज्ञानेश्वर | टुणुटुणु टुणुटुणु रे वानरा मारी उड्या तू रे वानरा पारंबीसी लोंबकळू रे वानरा झोके तू घेसी रे वानरा भक्षिण्या तू धुंडी रे वानरा कंदमुळु आवडीची रे वानरा शोभविले तव कुळू रे वानरा सुग्रीव-हनुमानु रे वानरा |
No comments:
Post a Comment