खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
कुजबुज | आणि काही काळानंतर |
---|---|
डोळ्यांतल्या दिव्यांची का तेलवात झाली? दोघांतल्या गुजाची जाहीर बात झाली मी डाव टाकला की तू फेकलेस जाळे? खेळात उभयतांची जिंकून मात झाली आयुष्यरखरखाटा आच्छादलेस ऐसे मध्यान्हिच्या उन्हाची पौर्णीम रात झाली खुलली सुवर्णकांती अजुनी मदालसेची हळदीत नाहली अन् सिंदूरस्नात झाली जाता जवळ जरासा, रोमांचली नवोढा धडधड अधीर, नूतन नवख्या उरात झाली हाकी अरूण निर्दय वेगात रथ असा का आरूढ ज्यावरी ही अरसिक प्रभात झाली? फुलुनी खुणावणारी होती फुलंही दोषी अपकीर्ति पण अलीची रानावनात झाली करता मिलिंद गुंजन अलगद मधास लुटतो कुजबुज अशी जनांची आपापसात झाली कवी : मिलिंद फणसे |
त्या कालच्या स्वप्नांची आज होळी झाली दोघांतल्या तड्याची जाहीर बात झाली “मी डाव टाकला की तू फेकलेस जाळे?” - वादात उभयतांच्या स्वप्नांची माती झाली आयुष्यरखरखाटा खरखरणारा खराटा आयुष्यी अपुल्या आला त्सुनामीचा झपाटा स्वप्नाळू गीते रचली होती मदालसी मी “मदालसा” वगैरे शब्द विखरत बेलगामी कोर्टाजवळ जाता वकिलासमवेत माझ्या धडधड धडधड माझ्या उरात झाली हाकी अरूण तटस्थ धीमे रथ रवीचा सेकंद-मिनिट-तास-दिन-सप्ताह-मास जाता इशारे खुणावणारी होती अनेक चिह्ने दुर्लक्षिली, परिणती वाताहतीत झाली करता मिलिंद कविता सोमरसपान करतो कुजबुज अशी जनांची आपापसात झाली |
No comments:
Post a Comment