Sunday, June 19, 2011

(९४) चांदण्यात झुलतो बाई........................ कसा झाला बाई



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



चांदण्यात झुलतो बाई कसा झाला बाई



चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा
गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा

पीस मयूरी अलगद हे या हृदयातूनी
पहिली प्रीती साद घालिते या गाण्यातूनी
निळावल्या स्वप्नांचा मोर नाचरा

मोहरल्या वाटा आता, मंतरली राने
हुरहुरल्या शपथा येथे, झुरमुरली पाने
अधरांचा, स्पर्शांचा, भास बावरा

तळहातावर भिजली मेंदी, स्वप्न होऊनी
ओठांवरती रुजले गाणे जन्म होऊनी
ध्यासांचा, भासांचा गोड भोवरा

कवी : प्रवीण दवणे


कसा झाला बाई माझा आवाज घोगरा
काल भिजले येता अवचित वळवाच्या धारा

पिते सरबत लिंबाचे पेला भरूनी
करते आळवणी घश्याची या गाण्यातूनी -
करी कृपा मजवरी, हो सत्वरी बरा

मोहरीच्या चिमटीने मंतरली पाने
पुटपुटले मंत्र काही मी जोशाने
बाष्परूपे निघून जाई सर्दी, भास झाला

तळहातावर निजला तीळ सुखस्वप्नीं
पाठीवर निजले मी होऊनी उताणी
आयुष्य संथ नदी नसे, एक केवळ भोवरा!


No comments:

Post a Comment