खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
चांदण्यात फिरताना | चोर आणि पोलीस |
---|---|
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे, आवर ही सावर ही चांदरात निजलेल्या गावातुन आले मी एकटीच; दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच; ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे, आवर ही सावर ही चांदरात सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर? तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर श्वास तुझा मालकंस ! स्पर्श तुझा पारिजात! चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे, आवर ही सावर ही चांदरात जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून, पण माझी तुळस तिथे गेली रे हिरमुसून तुझिया नयनात चंद्र ! माझ्या हृदयी प्रभात चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे, आवर ही सावर ही चांदरात कवी : सुरेश भट | अंधारात फिरताना माझा पकडलास हात बाबा रे, नाही आता मी कुठेही जात निजलेल्या गावातुन जात होतो एकटाच; दूर दिवे मिणमिणत पडले होते उगाच; ह्या इथल्या पोलिसचौकीं नित्य सारे झोपतात पण अंधारात फिरताना माझा पकडलास हात बाबा रे, नाही आता मी कुठेही जात सांग कसा देऊ शके तव हातावर तूर? वा सांग कसा देऊनी चिरीमिरी करू तुज मी फितूर? श्वास तुझा वातचक्र! स्पर्श तुझा हिमपात! अंधारात फिरताना माझा पकडलास हात बाबा रे, नाही आता मी कुठेही जात ******************************************** ए, चल उचल पाऊल बडबड ज्यादा तुझि संपवून माझी ड्युटी लौकर संपतेय लक्षात हे घेऊन तुझिया नयनात जरि खंत मन्मनी ड्युटीचा अंत अंधारात फिरताना पकडला तुझा हात बच्चमजी, नाही आता तू कुठेही जात |
चांदण्यात फिरताना | एका गावगुंडाशी गाठ |
---|---|
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे, आवर ही सावर ही चांदरात निजलेल्या गावातुन आले मी एकटीच; दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच; ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे, आवर ही सावर ही चांदरात सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर? तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर श्वास तुझा मालकंस ! स्पर्श तुझा पारिजात! चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे, आवर ही सावर ही चांदरात जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून, पण माझी तुळस तिथे गेली रे हिरमुसून तुझिया नयनात चंद्र ! माझ्या हृदयी प्रभात चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे, आवर ही सावर ही चांदरात कवी : सुरेश भट | रस्त्यातुन चालताना माझा धरलास हात चंडाळा, आवर ही फाजील तु्झी रीत नवख्या गावातुन चाले मी एकटीच; नगरपालिकेचे दिवे बंद पडले कधीच; ह्या इथल्या पोलिसचौकीं नित्य सारे झोपतात रस्त्यातुन चालताना माझा धरलास हात चंडाळा, आवर ही फाजील तु्झी रीत सांग कशी सुरक्षित, देवा, पार करू ही वाट? हा माणूस छळवादी अन् भासे निष्ठुर श्वास माझा धडधडत, स्पर्श त्याचा करी भयभीत रस्त्यातुन चालताना माझा धरला त्याने हात चंडाळ आवरेल का फाजील त्याची रीत? ******************************************** उचल पाऊल, पळ प्रार्थना तुझी संपवून माझी कणव क्षणात संपेल हे लक्षात घेऊन तुझिया नयनात भय, माझ्या हृदयी फत्तर रस्त्यातुन चालताना तुझा धरला मी हात सोडला तो मी परी, क्षणभर कणव येत |
No comments:
Post a Comment