Sunday, June 19, 2011

(९२) कधी सांजवेळी............................................चिंता



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



कधी सांजवेळी चिंता



कधी सांजवेळी मला आठवुनी
तुझ्या भोवताली जराशी वळुनी,
पाहशील का?
पाहशील का?

तुझा दूर येथे उठू दे शहारा
शरीरावरुनी जसा गार वारा,
वाहशील का?
वाहशील का?

रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी
राहशील का?
राहशील का?

तुझ्या आठवांना इथे साहतो मी
तुला साहतो मी तशी तू मलाही
साहशील का?
साहशील का?

कवी : सौमित्र



रोज सकाळी, वर उन्हे आली तरी
कुशीवर अपुल्या संथ वळूनी
निजशील का?
निजशील का?

उठवावया तुज वाजवता मी नगारा
ओढूनी चादर शरीरावरुनी
निजशील का?
निजशील का?

वाजविता सूर सनईचे तव कानाशी
मंदस्मितवदने तू डाराडुर
निजशील का?
निजशील का?

तुझ्या आळशीपणास साहतो मी
अधिकाधिक आळशी होत तू
राहशील का?
राहशील का?




No comments:

Post a Comment