खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
तू सप्तसूर माझे | संतप्त सूर तूझे |
---|---|
तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा जागेपणी मी पाहिले ते सत्य सारे देखणे माझे मला आले हसू आकाश झाले ठेंगणे निमिषात सारे संपले हुंकार ये प्रीतीचा गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा तू छेडिता माझ्या मना तारा अशा झंकारल्या माझ्या सवे येताच तू दाही दिशा गंधाळल्या हे हासणे अन् लाजणे हा खेळ ऊन पावसाचा गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा कवी : अशोक पत्की | संतप्त सूर तूझे उच्छ्वास अंतरीचा गाण्यास लाभला हा तव स्पर्श चंडिकेचा जागेपणी मी पाहिले ते सत्य खास नसणे भासे मला हे सारे आकाश खाली कोसळणे निमिषात सारे संपले हुंकार अंतकालचा गाण्यास लाभला हा तव स्पर्श चंडिकेचा तू छेडिता माझ्या मना कळा बहु उपजल्या चिंध्या माझ्या मनाच्या दाही दिशां उधळल्या हे छेडणे अन् पिंजणे हा खेळ समंधाचा गाण्यास लाभला हा तव स्पर्श चंडिकेचा |
No comments:
Post a Comment