Sunday, June 19, 2011

(९०) कोटी कोटी रुपे तुझी........................मंत्रीपदधार्‍याचे स्तवन



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



कोटी कोटी रुपे तुझी मंत्रीपदधार्‍याचे स्तवन



कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे
कुठे कुठे शोधु तुला, तुझे अनंत देव्हारे

बीज अंकुरे ज्या ठायी, तिथे तुझा वास
तुझा स्पर्श आणुन देतो, फुलाला सुवास
चराचरा रंगवीशी, रंग तुझा कोणता रे?
कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे

कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला
जनी निर्जनीही तूझा, पाय रोवलेला
तुझी खूण नाही ऐसा गाव तरी कोणता रे?
कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे

खरे रूप देवा तूझे, कोणते कळेना
तूच विटेवरी, तूच वैकुंठीचा राणा
तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता रे?
कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे

कवी : यशवंत देव


कोटी कोटी रुपये तुझे, कोटी सूर्य चंद्र तारे
कुठे कुठे शोधु तुला, तुझे अनंत देव्हारे

पैशाचा जिथे लागे वास, तिथे तुझा श्वास
तुझा स्पर्श आणुन देतो, पैशाला सुवास
कथा तुझ्या रंगवीशी, रंग तुझा कोणता रे?
कोटी कोटी रुपये तुझे, कोटी सूर्य चंद्र तारे

कधी दहा तोंडांचा तू उच्चारिसी दहा बोलां
कुठल्याही सभेमधे, तुझा पाय रोवलेला
तुझी खूण नाही ऐसा गाव तरी कोणता रे?
कोटी कोटी रुपये तुझे, कोटी सूर्य चंद्र तारे

खरे रूप बाबा तूझे, कोणते कळेना
तूच मंत्रीपदी, तूच जनतेचा राणा
तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता रे?
कोटी कोटी रुपये तुझे, कोटी सूर्य चंद्र तारे


No comments:

Post a Comment