खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
दोन ध्रुवांवर दोघे आपण | दोन ध्रुवांवर दोघे आपण |
---|---|
दोन ध्रुवांवर दोघे आपण तू तिकडे अन् मी इकडे वाऱ्यावरती जशी चुकावी रानपाखरे दोहिकडे दिवस मनाला वैरि भासतो तारा मोजित रात गुजरितो युगसम वाटे घडीघडी ही कालगती का बंद पडे? वसंतासवे धरा नाचते तांडव भीषण मज ते गमते गजबजलेल्या जगात जगतो जीवन एकलकोंडे नि:श्वसिते तव सांगायाला पश्चिमवारा बिलगे मजला शीतल कोमल तुझ्या करांचा सर्वांगी जणु स्पर्श घडे स्मृति-पंखांनी भिरभिर फिरते प्रीतपाखरू तुझ्याच भवते मुक्या मनाचे दु:ख सागरा सांग गर्जुनी तू तिकडे तोच असे मी, घर हे तेही तोच सखी, संसार असेही तुझ्यावाचुनी शून्य पसारा प्राण तिथे अन् देह इथे कवी : मा. ग. पातकर | दोन ध्रुवांवर दोघे आपण तू तिकडे अन् मी इकडे वाऱ्यावरती जशी उडावी धूळच धूळ चोहिकडे! मी तुजला जणु वैरि भासतो बोटे मोडित वेळ दवडितो युगसम वाटे घडीघडी ही कालगती का बंद पडे? जिव्हेवर जे काय तुझ्या नाचते तांडव भीषण मज ते गमते मुठीत घेउनि जीव मी जगतो जीवन एक बडे कोडे! समज जरा तुला सांगायाला पश्चिमवारा इथे उगवला कल्लोल ऐकुन तुझ्या स्वरांचा पार तो वारा परी गडबडे! माझे मस्तक भिरभिर फिरते भोवर्यात जणु गरगरते नादी अपुल्या व्यग्र परंतू राहशी गर्जत तू तिकडे! तोच असे मी, तोच असामी, तीच असे तू, तीच त्सुनामी शून्यदृष्टिने नित्य स्वगत करतो : "न कळे कसे सुटणार त्रांगडे!” |
No comments:
Post a Comment