Sunday, June 19, 2011

(८८) अपार हा भवसागर दुस्तर....................रुपयाचे स्तवन



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



अपार हा भवसागर दुस्तर रुपयाचे स्तवन

अपार हा भवसागर दुस्तर
तुझ्या कृपेविण कोण तरे
जय जय दुर्गे शुभंकरे!

तुझ्या कृपेने संकट टळते
तुझ्या कृपेने वैभव येते
तुझ्या कृपेने पंगू देखिल
करी उल्लंघन गिरीशिखरे!

तुझ्या कृपेचा मेघ बरसता
आशेची उद्याने फुलता
ह्या संसारी, विश्वमंदिरी
आनंदाचा गंध भरे!

दुराचार दंभाच्या नगरी
अनाचार अवसेच्या तिमिरी
त्रिशूळ तव चमकता अचानक
दुरिताचा अंधार नुरे

कवी : विद्याधर गोखले
चित्रपट : सुंदरा सातारकर (१९८१)


अपार हा भवसागर दुस्तर
तुझ्या कृपेविण कोण तरे
जय जय रुपया तू कृपा करे!

तुझ्या कृपेने संकट टळते
तुझ्या कृपेने वैभव येते
तुझ्या कृपेने मुंगी देखिल
करी उल्लंघन गिरीशिखरे!

तुझ्या कृपेचा मेघ बरसता
नंदनवन माझ्या घरी फुलता
ह्या कोल्हापुरी , माझ्या मंदिरी
आनंदाचा हौद भरे!

दुंदुभिनाद आनंदे करता
दिवसा वा रात्रीच्या तिमिरी
तेज तव चमकता चकाचक
समस्त अंधार अपहरे

जय जय रुपया तू कृपा करे!



No comments:

Post a Comment