Saturday, June 18, 2011

(८७) अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत................सबसे बडा रुपैया



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत सबसे बडा रुपैया



अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत
निसर्गात भरूनी राहे अनादी अनंत
कधी पावसाच्या धारा
भणाणता केव्हा वारा
पहाटेस होऊन तारा
हसे रूपवंत

ग्रीष्म रक्त पेटविणारा
शिशिर आग गोठविणारा
मनोगते मिळविणारा
फुलारी वसंत

कुशीमध्ये त्याच्या जावे
मिठीमध्ये त्याला घ्यावे
शाश्वतात विरूनी जावे
सर्व नाशवंत


कवी : सुधीर मोघे


रुपयास म्हणती “रुपी” आंग्ल संत
तिजोर्‍या जयाच्या भरुनी राहती लक्ष्मीवंत
अविरत त्याच्या धारा
पडती अंगणी तास बारा
पहा वरी नभी रात्री, तारा
लुकलुके शोभिवंत!

थंड रक्त उबवणारा
उष्ण रक्त शमवणारा
मनोगते पुरवणारा
दुलारी महंत!

कुशीमधे त्याला घ्यावे
उशीमधे त्याला भरावे
झोपेत प्रेमे कुरवळावे;
वित्त बळवंत!



No comments:

Post a Comment