खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
येशिल, येशिल, येशिल | राम राम , पाव्हणं |
---|---|
येशिल, येशिल, येशिल, राणी; पहाटे पहाटे येशिल? तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन देशील? ओलेती पहाट शहाऱ्याची लाट गळ्यात रेशमी बाहू तुझी हनुवटी जरा उचलता नको ना रागाने पाहू प्राजक्त फुलांचा पाऊस झेलीत मिठीत मिटून जाशिल? चंद्र मावळेल वाट दाखवेल शुक्राचा टपोरा तारा कोवळ्या क्षणाचे जपून लक्षण सांगेल कोवळा वारा भानात नसून गालात हसून ललाट चुंबन घेशिल? वाजता पाऊल घेईल चाहूल जाळीत चोरटा पक्षी कोणाला दिसेना, असू दे असेना, मीलना एखादा साक्षी धुक्याने ढगांना झाकून टाकता मुक्याने माझी तू होशिल? कवी : वसंत बापट | येशिल आगंतुक, परंतु पाहुण्या, सांग कधी जाशील? की माझ्या पाहुणचाराचा फायदा उठवशील? कल्पनाच शहाऱ्याची पीडा गळ्यात तुझी कायमची पडता जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसेल मूर्ती तव अवताराची. प्रलयकाळच्या हे पर्जन्याचे मिटवुन दुःस्वप्न जाशील? मावळता चंद्र वाट दाखविन माझ्या कुटीबाहेर कुठेही त्रिभुवनी, अती हर्षून. प्रश्न विचारेल का मज वारा बेफाम सुटून, गालात हसून : “ललाटलिखित कसं चुकवशील?” * * आः! वाजले पाऊल, घेतली चाहूल दारात उभा तो यक्ष! मला दिसेना काही, भोवळ आली, सांगतो देवासाक्ष. "धुके ढगांना झाकते, देवा, अदृश्य तसे त्याला करशील?” |
No comments:
Post a Comment