Saturday, June 18, 2011

(८५) दिस चार झाले मन......................कवीच्या प्रतिभेचा अस्त!



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



दिस चार झाले मन कवीच्या प्रतिभेचा अस्त!



दिस चार झाले मन, पाखरू होऊन
पानपान आर्त आणि झाड बावरून

सांजवेळी जेव्हा येई आठव आठव
दूर कुठे मंदिरात होई घंटारव
उभा अंगावर राही काटा सरसरून

नकळत आठवणी जसे विसरले
वाटेवर इथे तसे ठसे उमटले
दूर वेडेपिसे सूर सनईभरून

झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
आता जरी आला इथे ऋतु वसंताचा
ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून

कवी : सौमित्र
चित्रपट : आईशप्पथ...! (२००६)

दिस खूप झाले मज कविता करून
पान पुढ्यात ठेवून , पेन सावरून

जेव्हा येई त्या गोष्टीचा आठव
व्यथित मम मन करी करुणारव
उभा अंगावर राही काटा सरसरून

न कळत साठवणीतील कुठे विरले
"धुंद", “मंद", “गंध" आदी शब्द ठेवणीतले
करत असे मी कविता एक पिंप भरून!

झाला जरी शिडकावा शब्दपावसाचा
गीतांकुर न फुटे, रोध धरणीचा
हाय, जाय गीतनिर्मितीचा मोसम ओसरून!



No comments:

Post a Comment