Saturday, June 18, 2011

(८४) हिरव्या हिरव्या रंगाची.......................करड्या करड्या रंगाची



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



हिरव्या हिरव्या रंगाची करड्या करड्या रंगाची



हिरव्या हिरव्या रंगाची झाडि घनदाट
सांग्‌ गो चेड्‌वा दिस्तां कसो खंडळ्याचो घाट

हिरव्याहिरव्या झाडीत हिरवीहिरवी पानां
हिरव्याहिरव्या पानांत वारो गाता गानां
पुना-बाँबे हीच गो तुझ्या सासरची वाट

खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार
थंडिमधे लालि चढे गालि गुलजार
तोऱ्यामध्ये होऊ नको उगी अशी ताठ

बोगद्यात गाडी जाता होई अंधार
अंधारात प्रीत घेता प्रीतिचो आधार
इंजिनाच्या मागे जाती डबे मागोमाग

कवी : रमेश अणावकर


करड्या करड्या रंगाची ताडी हाय भन्नाट
सांग्‌ रं दोस्तू दिस्तां कसो हामचो घाट

करड्या करड्या ताडीत व्होवूनशान दिवाना
भरम भरम गरम वारो गातो गानां
मोरगाव-जेजुरी ह्यीच त्येची नीहमीची वाट

खंडुबाच्या फुड्यात घालुनी नमस्कार
पिता ताडी चढे पार कानशीलापार
म्होर्‍यामधी र्‍हाऊ नको उगी असा ताठ

पिता पिता ताडी करडी, व्होई अंधार
अंधारात घुटका घीता भींतीचो आधार
झोपडीच्या मागी असती ताडीचे दोन माठ


No comments:

Post a Comment