खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
आली हासत पहिली रात | आज कशास उद्याची भ्रांत? |
---|---|
आली हासत पहिली रात उजळत प्राणांची फुलवात प्रकाश पडता माझ्यावरती फुलते बहरुन माझे यौवन हसली मग ती चंचल होऊन नयनांच्या महालात आली हासत पहिली रात मोहक सुंदर फूल जिवाचें पती चरणांवर प्रीत अर्पिता मीलनाचा स्पर्श होता विरली अर्धांगात आली हासत पहिली रात लाज बावरी, मी बावरता हर्षही माझा, बघतो चोरुन भास तयाचा नेतो ओढून स्वप्नांच्या हृदयात आली हासत पहिली रात कवी : पी. सावळाराम |
आज कशास उद्याची भ्रांत? उगवेल उद्याही सूर्य संपता रात प्रकाश पडता धरणीवरती फुले तर्हांची नाना फुलती हसती मग ती प्रमुदित होऊन दर्या-खोर्या-वनात आज कशास उद्याची भ्रांत? मोहक सुंदर मूल गोजिरे आज पाठीवरी, उद्या पडेल उपडे आणखी काही दिवस जाता पळेल हातोहात! आज कशास उद्याची भ्रांत? लाज बावरी आजची ललना चालू असता तिची दिनक्रमणा होईल आई, होईल आजी; कालचक्र चालते अविरत आज कशास उद्याची भ्रांत? |
No comments:
Post a Comment