खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
आई, बघ ना कसा हा दादा | गुंड |
---|---|
आई, बघ ना कसा हा दादा मला चिडवायचं हाच याचा धंदा लग्न बाहुलीचं लावतां आम्ही म्हणतो, "नवरदेव आहे मी आतां मलाच मुंडावळि बांधा" कधी मोठे मोठे करतो डोळे कधी उगाच विदुषकि चाळे भारी खट्याळ, नाहि मुळि साधा दादा भलताच द्वाड आहे आई खोड्या करून छळतो बाई याला ओवाळायचि नाहि मी यंदा कवयित्री : शांता शेळके | असे तो आडदांड दादा भंडावायचं लोकां हाच त्याचा धंदा कुठल्याही दुकानी शिरुनी म्हणतो, "आहे माहित कोण मी? चला, बर्या बोले खंडणी काढा” देऊन धमक्या मोठे करतो डोळे कधी आणखी काहीतरी चाळे भारी निर्घृण, असे केवळ विषबाधा भलतीच त्याची गुंडशाही, छळत अनेक तर्हांनी राही उडविल का कोणी त्याला यंदा? |
No comments:
Post a Comment