Saturday, June 18, 2011

(८१) नाते जुळले मनाशी मनाचे (१)................गुप्त पोलिसाचा सापळा
*****नाते जुळले मनाशी मनाचे (२)................नाते तुटले शेजार्‍यांचे नि अमुचे



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



नाते जुळले मनाशी मनाचे गुप्त पोलिसाचा सापळा



नाते जुळले मनाशी मनाचे
फुले गीत ओठी अनोख्या सुरांचे

कशी मूर्त केली खुळ्या लोचनांनी
तुझ्या अंतरीची अबोली कहाणी?
कसे फूल झाले दिवाण्या कळीचे?

जुळे ही मिठी बावर्‍या लोचनांची
जशी भेट होते नदी-सागराची
मनी नाचती हे रंग अमृताचे

उरो ध्यास भवती नुरो भान काही
सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
क्षणी रूप दिसले मला नंदनाचे

कवयित्री : वंदना विटणकर


नाते जुळले कुणाशी माझे
छुपे शब्द ओठी मूक संकेतांचे

कसे मूर्त केले मारल्या लोचनाने
आपल्या अंतरीचे छुपे देणेघेणे?
कसे "फूल" केले सगळ्या जगाते

गती अपुल्या भिरभिरत्या लोचनांची
जशी स्थिती असे नदीतल्या भोवर्‍यांची
मनी नाचती विचार कोटीकोटींचे

असे कोण भवती नुरे भान काही
सुस्वप्नात न्हाल्या दिशा धुंद दाही
हाय, खडे उभे रूप गुप्त पोलिसाचे!





नाते जुळले मनाशी मनाचे नाते तुटले शेजार्‍यांचे नि अमुचे



नाते जुळले मनाशी मनाचे
फुले गीत ओठी अनोख्या सुरांचे

कशी मूर्त केली खुळ्या लोचनांनी
तुझ्या अंतरीची अबोली कहाणी?
कसे फूल झाले दिवाण्या कळीचे?

जुळे ही मिठी बावर्‍या लोचनांची
जशी भेट होते नदी-सागराची
मनी नाचती हे रंग अमृताचे

उरो ध्यास भवती नुरो भान काही
सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
क्षणी रूप दिसले मला नंदनाचे

कवयित्री : वंदना विटणकर



नाते तुटले शेजार्‍यांचे नि अमुचे
फुलती निखारे मनी कुविचारांचे

कशी खोडी केली खुळ्या ह्या जनांनी
शब्दांनी कुण्या ती वर्णावी कहाणी?
कसे थेर झाले दिवाण्या कळींचे?

टळो गाठ कधीही आमची नि त्यांची
जशी भेट व्हावी नकुलाची नि अहीची
मनी ना खास हे रंग अमृताचे!

कुंपण घराभवती, नुरे संबंध काही
केल्या जणू काही दिशा बंद दाही
जरा स्वास्थ्य आले गमे एकदाचे!



No comments:

Post a Comment