Saturday, June 18, 2011

(८०) आई, मला पावसांत जाउं दे..............आईचे उत्तर



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



आई, मला पावसांत जाउं दे आईचे उत्तर

आई, मला पावसांत जाउं दे
एकदांच ग भिजुनी मला
चिंब चिंब होउं दे

मेघ कसे हे गडगड करिती
विजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगें अंगणांत मज
खूप खूप नाचुं दे

खिडकीखालीं तळें साचलें
गुडघ्याइतकें पाणी भरलें
तऱ्हेतऱ्हेच्या होड्यांची मज
शर्यत ग, लावुं दे

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडूकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला
पाठलाग करूं दे

धारेखालीं उभा राहुनी
पायानें मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी
वाट्टेल तें होउं दे



कवयित्री : वंदना विटणकर









.
.
.
.
कवी वदे तू याचिली अनुमती -
"विजा नभांतुन मला खुणविती
"त्यांच्यासंगें अंगणांत मज
"खूप खूप नाचुं दे"

पण एकही बालक मला न माहिती
जे वदे, “मला विजा खुणविती
"त्यांच्यासंगें अंगणांत मज
"खूप खूप नाचुं दे"

कडकडाट होउन जेव्हा विजा पडती
घाबरून आईला मुले बिलगती
स्वाभाविक ती स्वसंरक्षणमती,
मीही तशीच घाबरते

कवी वदे, तुझ्या दृष्टीपथी येतो
बदकांचा थवा जेव्हा पाऊस पडतो;
बदके शहरी आली कधी होती
सांग रे, बाळू, तूची मला ते

कवी वदे, तुज मुळीच नव्हती
ताप, खोकला, सर्दी यांची क्षिती;
अशा काव्यकल्पनांच्या कवीला
भरार्‍या गगनी मारू दे!

होता ताप, खोकला, सर्दी
होशी बेजार आजारांच्या दर्दी
कडू औषधे आणि गोळ्या
घेण्या सांग कोण मग कुरकुरते?



No comments:

Post a Comment