Friday, June 17, 2011

(७९) आज गोकुळात रंग खेळतो हरी........हरीचे गल्लीतले क्रिकेट



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



आज गोकुळात रंग खेळतो हरी हरीचे गल्लीतले क्रिकेट



आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी!

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
रंगवून, रंगूनी गुलाल टाकतो
सांगते अजूनही तुला परोपरी

सांग श्याम सुंदरास काय जाहले
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले
एकटीच वाचशील काय तू तरी!

त्या तिथे अनंगरंगरास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदुंग मंजिर्‍यात वाजला
हाय ! वाजली फिरुन तीच बासरी!

कवी : सुरेश भट


गल्लीत क्रिकेट रोज खेळतो हरी
राधिके, जपून, हरी मारिल बाउंडरी

भीमापरी तो क्रिकेट खेळतो
आडवीतिडवी बॅट फिरवतो
गोलंदाजीत गुगली टाकतो
सांगतो स्वस्थ बस तू घरी

देव जाणे काय हरीस जाहले
फटकावल्याविना कंदुके न कुणा सोडले
ज्यास त्यास कंदुक पाठी लागले
एकटीच वाचशील काय तू तरी!

त्या "रणांगणी" वीर पार रंगला
इतर कारट्यांसवे मुकुंद दंगला
तो पहा अचानक मृदुंग वाजला
आः! फिरुन मारी हरी बाउंडरी!


No comments:

Post a Comment