Thursday, June 16, 2011

(७८) अय्या बाई, इश्श बाई..........................नातवाचे कौतुक



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



अय्या बाई, इश्श बाई नातवाचे कौतुक



अय्या बाई, इश्श बाई,
सांगू काय पुढे?
गुलाबाचा रंग
माझ्या गालावर चढे

काहीतरी झाले आहे,
कोणीतरी आले आहे
त्याचे हसू गोड आहे,
मला त्याची ओढ आहे
मला त्याची ओढ आहे,
त्याची माझी जोड आहे
सांगताना बोल बाई
ओठांवर अडे

माझ्यापाशी झेप आहे,
त्याच्या डोळ्यांत झोप आहे
माझ्यापाशी वाण नाही,
त्याच्यापाशी जाण नाही
त्याच्यापाशी जाण नाही,
साहसाचे त्राण नाही
काय सांगू ? भलतेच
वेड मला जडे

माझे मन गात आहे,
त्याच्या हाती साथ आहे
माझ्या पायी चाल आहे,
त्याच्या हाती ताल आहे
त्याच्या हाती ताल आहे,
अशी काही धमाल आहे
त्याच्या मनाआड जाऊन
माझे मन दडे

माझ्या शेजारी तो आहे,
त्याच्या शेजारी मी आहे
त्याला काही मागायचे आहे,
मला काही द्यायचे आहे
मला काही द्यायचे आहे,
दोघांना काही प्यायचे आहे
आधी कोणी बोलावे
हे जरा कोडे पडे

कवी : ग. दि. माडगूळकर
चित्रपट : आंधळा मागतो एक डोळा [१९५६]

ठमाबाई, ठकूबाई,
सांगू का मी पुढे?
द्वाड माझा नातू
माझ्या पाठीवर चढे

काहीतरी झाले आहे,
कसेतरी आले आहे
त्याचे हसू गोड आहे,
मला त्याची ओढ आहे
मला त्याची ओढ आहे,
त्याची माझी जोडी आहे
सांगताना कवतिक त्याचे
माझे न संपेल गाडे

माझ्यापाशी माया आहे,
त्याच्या डोळीं लब्बाडी आहे
माझ्यापाशी त्राण नाही,
त्याच्यापाशी जाण नाही
त्याच्यापाशी जाण नाही,
साहसाची वाण नाही
काय सांगू? भलतेच
प्रेम मला जडे

माझे मन गात आहे,
त्याच्या हाती टाळ आहे
माझ्या पायी ताल आहे,
त्याच्या हाती डफ आहे
त्याच्या हाती पिपाणी आहे,
अशी काही धमाल आहे
केव्हा तो काय करी,
छाती माझी धडधडे

माझ्याजवळ तो आहे,
त्याच्याजवळ मी आहे
त्याला नित्य मागायचे आहे,
मला नित्य द्यायचे आहे
त्याला दूध द्यायचे आहे,
त्याला ते न प्यायचे आहे
आता काय करावे
हे मला कोडे पडे


No comments:

Post a Comment