खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
अजब सोहळा | कविविलाप |
---|---|
अजब सोहळा! अजब सोहळा! माती भिडली आभाळा! मुकी मायबाई तिला राग नाही तुडवून पायी तिचा केला चोळामोळा किती काळ साहील? किती मूक राहील? वादळली माती करी वा-याचा हिंदोळा! कुणी पाय देता चढे धूळ माथा माणसा रे, आता बघ उघडून डोळा! मातीची धरती देह मातीचा वरती माती जागवू दे मातीचा जिव्हाळा! कवयित्री : शांता शेळके चित्रपट : गारंबीचा बापू (१९८०) |
भगवंता, कृपाळा, जमवला मी मोठ्ठा गीतांचा मेळा चिनी-जपानी जनता तिचा राग नाही तुडवून पायी तिने केला चोळामोळा गीतांचा माझ्या केला चोळामोळा किती काळ साहील ? किती मूक राहील ? काव्य माझे जया वा-याचा हिंदोळा जया वा-याचा हिंदोळा कुणी पाय देता कुणी अग्नी देता माणसांनो, आता बघा उघडून डोळा बघा उघडून डोळा मातीची धरती माझे काव्य तिच्या वरती मातीच राखू दे माझ्या काव्याचा जिव्हाळा माझ्या काव्याचा जिव्हाळा |
No comments:
Post a Comment