Thursday, June 16, 2011

(७६) वेगवेगळी फुले उमलली....................वेगवेगळी पाहिली स्वप्ने



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



वेगवेगळी फुले उमलली वेगवेगळी पाहिली स्वप्ने

वेगवेगळी फुले उमलली,
रचुनि त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले,
गेले! ते दिन गेले

कदंब-तरूला बांधुनि दोला,
उंच-खालती झोले
परस्परांनी दिले-घेतले,
गेले! ते दिन गेले

हरीत बिलोरी वेलबुटीवरि,
शीतरसांचे प्याले
अन्योन्यांनी किती झोकले,
गेले! ते दिन गेले

निर्मलभावे नव देखावे,
भरुनी दोन्ही डोळे
तू मी मिळुनी रोज पाहिले,
गेले! ते दिन गेले

कवी : भवानीशंकर पंडित

वेगवेगळी पाहिली स्वप्ने
रचुनि त्यांची सूत्रे
रचताना थरकली गात्रे,
विरले! स्वप्न ते विरले

स्वनांमधे बांधले मी
अनेक बालेकिल्ले
बांधले मी किल्ले, बाले,
विरले! स्वप्न ते विरले

स्वनांमधे खेळलो लगोरी,
सोमरसांचे प्याले
प्याले प्याल्यांवरी झोकले,
विरले! स्वप्न ते विरले

स्वनांमधे नव देखावे,
भरुनी दोन्ही डोळे
मिटल्या डोळ्यां मी रोज पाहिले,
विरले! स्वप्न ते विरले



No comments:

Post a Comment