Thursday, June 16, 2011

(७५) दिव्य स्वातंत्र्य रवि आत्मतेजोबले.............मंत्री मंत्रीपदी लांड्यालबाड्यांबले



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



दिव्य स्वातंत्र्य रवि
आत्मतेजोबले
मंत्री मंत्रीपदी
लांड्यालबाड्यांबले



दिव्य स्वातंत्र्य रवि आत्मतेजोबले
प्रगटता अवनितलि कोण त्या लोपवी?

शौर्यसागर-लहरि गगन-मंडळ महा
भेदिता कवण त्या अबल कर थोपवी?

कवी : वामनराव जोशी
नाटक : रणदुंदुभि (१९२७)

मंत्री मंत्रीपदी लांड्यालबाड्यांबले
प्रगटता अवनितलि कोण त्या लोपवी?

कावासागर, लहरी, मंत्रीमंडळ महा
भेदिता कवण त्या अबल कर थोपवी?


No comments:

Post a Comment