खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
धुंद एकांत हा | एका गावगुंडाची कहाणी |
---|---|
धुंद एकांत हा, प्रीत आकारली सहज मी छेडीता, तार झंकारली जाण नाही मला,प्रीत आकारली सहज तू छेडीता, तार झंकारली गंधवेडी कुणी, लाजरी बावरी चांदणे शिंपिते चैत्रवेलीपरी यौवनाने तिला आज शृंगारली गोड संवेदना अंतरी या उठे फूल होता कळी, पाकळी ही मिटे लोचनी चिंतनी मूर्त साकारली रोमरोमांतूनी गीत मी गायिले दाट होता धुके, स्वप्न मी पाहीले पाहता पाहता रात्र अंधारली आज बाहूत या लाज आधारली कवी : जगदीश खेबुडकर चित्रपट : अनोळखी (१९७३) | गुंड एक हा, गुंडगिरी करी गुप्तपोलिसे छेडिता अरेरावी करी जाण नव्हती त्याला, होता तो अधिकारी गुप्तपोलिसे छेडिता अरेरावी करी गुंडगिरीत कुणी तरबेज जरी गुंडात नव्हती ह्या फारशी हुशारी यौवनाने होती केली वंचना पुरी अज्ञ संवेदना त्याच्या अंतरी सळसळी "फूल" होता जया कमी एक पाकळी लोचनी होती त्याच्या अज्ञता साकारली रोमरोमांतूनी त्याच्या अज्ञगीत गाई धुक्यात दाट राहुनी तो स्वप्न पाही पाहता पाहता रात्र अंधारली हातकडी पोलिसाची हाती त्याच्या पडली ! |
No comments:
Post a Comment