Monday, June 13, 2011

(५९) हीच दैना......................................हव्यास



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



हीच दैना हव्यास



सडलेल्या पंखांनांही
उडण्याचा लागे ध्यास
हाच माझा थोर गुन्हा
हाच माझा रे हव्यास

आकाशाची निळी भाषा
ऐकता न उरे पोच;
आणि गजांशी झुंजता
झिजे चोंच झिजे चोंच!

जाणिवेच्या पिंजर्‍यात
किंचाळत माझी मैना;
तरी मुके तिचे दु:ख,
हीच दैना हीच दैना

कवी : विंदा करंदीकर


सडलेल्या पंखांनांही
उडण्याचा लागे ध्यास
काव्य रचण्याचा सोस
ते प्रकाशित करण्याचा हव्यास

आकाशाची निळी भाषा
वसुधेची हरित भाषा
आणि माझ्या काव्याची
अनाकलनीय भाषा

काव्याच्या पिंजर्‍यात
किंचाळते माझी मैना;
किंचाळणे ऐकावे लागते तुम्हा
हीच दैना हीच दैना


No comments:

Post a Comment