Sunday, June 12, 2011

(५८) साठीचा गझल..........................तिचा तिशीचा गझल



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



साठीचा गझल तिचा तिशीचा गझल



सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी;
हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.

आम्हीहि त्यात होतो---खोटे कशास बोला---
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी!

उगवायची उषा ती अमुची तिच्याच नेत्री
अन मावळावयाची संध्या तिच्याच ओठी.

दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करुन छाटी!

जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारूतिला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी!

प्रत्यक्ष भेटली का? नव्हती तशी जरूरी;
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी.

हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी!

कवी : विंदा करंदीकर


सारे आपलेच आहे, आपल्याचसाठी
ही वृत्ती नवर्‍याची माझ्या असे ललाटी

लग्नापूर्वी कहाणी वेगळी पार होती
जरी मूळ वृत्ती त्याची आहे तशीच होती

"सखे, उगवते उषा तुझ्या नेत्रकमली
संध्याही मावळते तुझ्याच ओष्ठयुगली”

लग्नापूर्वी बोली त्याची ऐशी गंमतीची होती
त्या बोलीमागे स्वर्ग-स्वप्नसृष्टी होती

दुर्लक्षुनी ती बोली मी विचार केला -
"आहे ना धट्टाकट्टा, मध्यम पगारवाला

"काळीसावळी मी, नडलेलीच आहे
कुणाच्या तरी संगे संसार करणे आहे”

देउन होकार घातली माळ त्याच्या गळ्यात
दैवाने बांधले आम्हा एकमेकांच्या गळ्यात!


No comments:

Post a Comment