Monday, June 13, 2011

(६०) अवेळीच केव्हा दाटला अंधार...........सर्वत्र दाटला अविचारांचा अंधार



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



अवेळीच केव्हा दाटला अंधार सर्वत्र दाटला अविचारांचा अंधार


अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिला गळा जड झाले काळे सर
एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले
हासताना नभ कलून गेलेले

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
तिच्या पोटी कुण्या राव्याची सावली
जरा डोळियांत तिच्या मी पाहिले
काजळात चंद्र बुडून गेलेले

कवी : ना. धों. महानोर


सर्वत्र दाटला अविचारांचा अंधार
होते कुणी शिक्षक "काळे सर" -
करत दिनक्रमणा; नि एके दिवशी
भेटली त्यांना "प्रवासा"त कुणी "मावशी"

त्यांनी पाहिले तिला अंगभर
दिसे त्यांना "काचोळीच्या चांदण्याचा जर"
आणि म्हणे पडुनी त्यांना अपुला विसर
“मिठीत थरकले भरातील ज्वार”

कितीक दिसांनी भेटली त्यांना "मावशी"
तिच्या पोटी होती कुण्या राव्याची खुशी
तिच्या पोटाकडे पाहती काळे सर;
पडला का, सर, प्रकाश माथी, संपूनी अंधार?



1 comment: