खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
ये रे घना, ये रे घना | ये रे धना, ये रे धना |
---|---|
ये रे घना, ये रे घना न्हाउ घाल माझ्या मना फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू नको नको म्हणताना, गंध गेला रानावना टाकुनिया घरदार, नाचणार, नाचणार नको नको म्हणताना, मनमोर भर राना नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना कवी : आरती प्रभू |
ये रे धना, ये रे धना तू उजळ माझ्या वदना कमाई माझि अळुमाळु, घाम सांग किती गाळू नको नको म्हणताना, बॅंक सोडी फर्माना टाकुनिया घरदार, कुठे सांग मी जाणार नको नको म्हणताना, मोडला माझ्या पाठीचा कणा नको नको किती म्हणू, वाजणार आता बारा बोलावतो यमराजा, भासे मला रसपाना |
No comments:
Post a Comment