Monday, June 13, 2011

(६२) वद जाऊ कुणाला शरण?.......................मंत्री



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



वद जाऊ कुणाला शरण? मंत्री


वद जाऊ कुणाला शरण?
करील जो हरण संकटाचे
मी धरीन चरण त्याचे
अग सखये, मी धरीन चरण त्याचे

बहु आप्त बंधु बांधवा
आर्थिले कथुनी दु:ख मनीचे
ते होय विफल साचे
अग सखये, मी धरीन चरण त्याचे

मम तात जननी मात्र ती
बघुनि कष्ट हाल इचे
नचलेचि काही त्यांचे
अग सखये, मी धरीन चरण त्याचे

जे कर जोडुनि मजपुढे
नाचले थवे यादवांचे
प्रतिकूल होती साचे
अग सखये, मी धरीन चरण त्याचे

कवी : अण्णासाहेब किर्लोस्कर


मी जातो तयाला शरण
ज्या हाती पर्मिट कंत्राटाचे
मी धरतो चरण त्याचे
मी धरतो चरण त्याचे

बहु आप्त बंधु बांधवा
आर्थिले कथुनी जाच मनीचे
ते होय विफल साचे
मी धरतो चरण त्याचे

मम तात जननी मात्र ती
बघुनि कष्ट हाल सच्चे
सुचवती नाव त्याचे
मी धरतो चरण त्याचे

कर जोडुनि मी त्याच्यापुढे
विनम्रभावे देतो लाचे
होई अनुकूल मज, याचे
मी धरतो चरण त्याचे



No comments:

Post a Comment