Monday, June 13, 2011

(६३) फिटे अंधाराचे जाळे.........................फिटे कर्ज सगळे माझे



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



फिटे अंधाराचे जाळे फिटे कर्ज सगळे माझे



फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश

रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य, आले भरास भरास
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

दव पिऊन नवेली झाली, गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापुर्वीचे पालटे जग उदास उदास
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरी ही नवा सुवास सुवास
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

कवी : सुधीर मोघे


फिटे कर्ज सगळे, झाले मोकळे मन माझे
झाले प्रकाशमय अनंत आकाश, उतरले ओझे

रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या
फिटले कर्ज सगळे, आनंदे मम मन गरजे
फिटले कर्ज सगळे, आनंदे मी पट्टा परजे

दव पिऊन नवेली झाली, गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
पूर्वीचे पालटे जग उदास उदास-खिन्न होते जे
फिटे कर्ज सगळे, कोण मानभंग माझा करू धजे

आला आजचा प्रकाश, सरला कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
स्वच्छ हवा घरात येई, उघडले दरवाजे
फिटले कर्ज सगळे, आनंदे मम मन गरजे


No comments:

Post a Comment