Monday, June 13, 2011

(६४) वाटेवर काटे वेचीत चाललो.....................मेंढपाळाचे गाणे



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



वाटेवर काटे वेचीत चाललो मेंढपाळाचे गाणे



वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो

मिसळुनी मेळ्यात कधी,
एक हात धरूनि कधी
आपुलीच साथ कधी करित चाललो

आधिचा प्रसाद घेत,
पुढची ऐकीत साद
नादातच शीळ वाजवित चाललो

चुकली तालात चाल,
लागला जिवास बोल
ढळलेला तोल सावरीत चाललो

खांद्यावर बाळगिले
ओझे सुखदुखा:चे
फेकुन देऊन अता परत चाललो


कवी : अनिल


खाटेवर बोटे मोडित पडलो
स्मृतिढगांवरुन त्या समयी चाललो

मिसळुनी मी मेंढ्यांमधी,
एक हाती धरूनि कधी
त्यांचीच साथ धरत सदा चाललो

हाती एक काठी घेत.
पुढची वाट पाहत
नादातच शीळ वाजवित चाललो

चुकता नादात चाल,
लागता पायास ठेच
ढळलेला तोल सावरीत चाललो

खांद्यावर बाळगिले
ओझे एका मेंढीचे
मेंढीला उतरवुन खाली पुढे मी चाललो



No comments:

Post a Comment